ओळखीचा विश्वासघात! आर्मीतील माजी जवानाकडून ४,२६,००० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी!


🛑 ब्रेकिंग न्यूज 🛑

ओळखीचा विश्वासघात! आर्मीतील माजी जवानाकडून ४,२६,००० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

पुणे 🔸 मुळशीतील एका महिलेकडून आर्मीतील माजी जवानाने ओळखीचा गैरफायदा घेत ४ लाख २६ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे शहरातील मुळशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्याची उकल मुंढवा पोलिस ठाण्याच्या गुन्हा शाखेच्या पथकाने केली असून आरोपी किरण भोसले याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सोन्याचे दागिने नेऊन त्यांची विक्री केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रघु महाराज, पोलीस अंमलदार रुपेश टोकेकर, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर आणि त्यांच्या पथकाने तपास करून आरोपीला जेरबंद केले.

🔸 पोलीसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे गुन्ह्याचा छडा लागला असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

📍 मुंढवा पोलिसांचे कौतुक होत आहे.


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!