🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨
पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ कडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून देशी बनावटीची ०४ पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. जुनी सांगवी) हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात अग्निशस्त्रासह येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीसह त्याचा साथीदार अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपींकडून सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे ०४ पिस्टल (किंमत १,६०,००० रुपये) व ०५ जिवंत काडतुसे KF 7.65 (किंमत ४,००० रुपये) असा एकूण १,६४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे व सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
#BreakingNews #PunePolice #CrimeBranchPune #GunSeizure #PuneCrime #PoliceAction #MaharashtraPolice #SafetyFirst #AntiCrime #PuneUpdates 🚔🔥







