१७ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद – दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ची मोठी कारवाई


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

१७ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद – दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ची मोठी कारवाई

पुणे : उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व घातक शस्त्राच्या गुन्ह्यातील तब्बल १७ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत महादेव श्रीरंग झाडे (वय २१, रा. अतुलनगर, एन.डी.ए. रोड, वारजे माळवाडी, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ही धडाकेबाज कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#BreakingNews #PunePolice #CrimeBranchPune #UttamnagarPolice #PoliceAction #RobberyCase #VehicleTheft #PuneCrime #MaharashtraPolice #LawAndOrder #CrimeUpdate


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!