🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करून दुकानांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास बी.टी. कवडे रोड, घोरपडी परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने दुकानांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. २७/२०२६ दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच तपास पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. भिमनगर, मुंढवा) याला तसेच त्याच्या तीन विधीसंघर्षग्रस्त साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ६ श्री. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.
#BreakingNews #PunePolice #MundhwaPolice #PuneCrime #PoliceAction #CrimeNews #Mundhwa #Ghorpadi #Pune #LawAndOrder #PoliceSuccess #MaharashtraPolice 🚔🔥







