लोहगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दुचाकी वाहन चोर जेरबंद


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

🔴 लोहगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दुचाकी वाहन चोर जेरबंद

पुणे शहरातील लोहगाव पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका वाहन चोराला जेरबंद केले आहे. गु.र.नं. ७१/२०२६ भा.न्या.स.क ३०३ (२) अंतर्गत दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयित इसम दुचाकी चोरी करताना दिसून आला. पोलिस अंमलदार ज्योतीराम देवकाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अमन शेशराव कांबळे (रा. शिवशंभो पार्क, पठारेवस्ती, लोहगाव) याचा शोध घेण्यात आला.

आरोपी संतनगर परिसरात चोरीच्या मोटारसायकलसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

#BreakingNews #PunePolice #LohgaonPolice #CrimeNews #VehicleTheft #PoliceAction #PuneCity #AlertCitizens #CrimeControl #MaharashtraPolice 🚔


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!