57cde6f6-7231-4763-aba6-b3eecf056b48 video link ⬆️
आज दिनांक 20/10/2025 रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील लावण्य हॉटेल जवळील ब्रिजचे खाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री करत असलेल्या बाबतचे प्राप्त माहिती अनुसार आम्ही स्वतः , पोलीस स्टेशन कडील स्टाफ असे मिळून नमूद घटनास्थळी गेलो असता सदर ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्री करणारी महिला नामे सौ.रेखा विजय काळकर ,वय ५० वर्षे राहणार तरवडे वस्ती , मोहम्मद वाडी पुणे हिस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे उध्वस्त करण्यात आलेले असून सदर बाबत पुढील कार्यवाही करता सदर महिलेस काळेपडळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेले आहे.
सदर बाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज सुरू आहे.
त्याचप्रमाणे सदर भागात काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सीआर मोबाईल व मार्शल तसेच तपास पथक यांना अधिक पेट्रोलिंग करून पुन्हा काही प्रकार आढळून आल्यास सदर बाबत योग्य ती कारवाई करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.








