🔴 ब्रेकिंग न्यूज – विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 🔴
पुणे : विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दोन गावठी पिस्तुल आणि एक काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. 💥
पोलिस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजेंद्रनगर परिसरात सापळा रचण्यात आला. तेव्हा संशयित इसम मयुर सचिन भोसले (वय २०, रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) हा पिस्तुलांसह आढळून आला.
त्याच्या ताब्यातून अंदाजे ₹१,००,२०० किंमतीची दोन गावठी पिस्तुलं व एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी गुन्हा क्र. २९०/२०२५, आर्म अॅक्ट क. ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत. 👮♂️
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ श्री. कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
👏 या कारवाईत तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
#BreakingNews #PunePolice #VishrambagPolice #CrimeNews #PuneCityPolice #PoliceAction #GunSeizure #MaharashtraNews








