🛑 ब्रेकिंग न्यूज | पुणे 📰
मुंढवा पोलिसांची चोख कामगिरी 💪
तीन मोटारसायकलवरून आलेल्या सहा अनोळखी आरोपींनी फिर्यादीवर केलेल्या हल्ल्याची उकल 🔍
मुंढवा पोलिसांनी गुन्ह्यातील तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन येरवडा येथील बालसुधारगृहात केली रवानगी 🚓
दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र रूमबाहेर बोलत असताना सहा इसमांनी धारधार हत्यारांसह घरावर दगडफेक करून मारहाण केली. या प्रकरणात मुंढवा पोलीसांनी जलदगतीने तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
तपासानंतर उघड झाले की हा प्रकार विधीसंघर्षग्रस्त बालकांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही बालकांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त अनुराधा उद्द्मले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर तपास पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम व पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण यांनी केले.
🚨 मुंढवा पोलिसांची दहशत निर्माण करणाऱ्या बालगुन्हेगारांवर प्रभावी कारवाई!
हॅशटॅग्स 👇
#BreakingNews #PunePolice #MundhwaPolice #CrimeNews #LawAndOrder #PoliceAction #PuneCity #SafetyFirst








