मकोका अंतर्गत फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने केलेली जेरबंदी!


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

मकोका अंतर्गत फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने केलेली जेरबंदी!

येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३६/२०२५ अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजय युवराज कसबे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार होता.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार व तपास पथकाच्या दक्षतेमुळे पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत पुणे-सोलापूर मार्गावर २०-२५ किमी पाठलाग करून आरोपीस ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले. आरोपीने आपली ओळख लपवून बसच्या सीटखाली लपण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या शिताफीमुळे त्याला पकडण्यात यश आले.

ही धडाकेबाज कारवाई श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), श्री. रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), श्री. मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग), श्री. सोमय मुंडे (उपायुक्त, परिमंडळ ४), श्रीमती प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात पोउनि प्रदिप सुर्वे, पोउनि महेश फटांगरे, पो.अं. शैलेश वाबळे, जायभाय, कांबळे, शिंदे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड, निलख यांचा समावेश होता.

🔹 आरोपी सध्या येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून पुढील तपास श्रीमती प्रांजली सोनवणे (सहा. पोलीस आयुक्त) करत आहेत.

📍 पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एक फरार गुन्हेगार अखेर तुरुंगाच्या दारात!

#PunePolice #YerwadaPolice #MCOCA #CrimeNews #BreakingNews #MaharashtraPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!