🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴
हडपसर पोलिसांची मोठी कारवाई!
मटका जुगार चालवणाऱ्या सराईत आरोपीवर एम.पी.डी.ए. अंतर्गत केली कठोर कारवाई 🚨
पुणे :
हडपसर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध मटका जुगार चालवून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या यल्लप्पा उर्फ यलय्या भिमय्या भंडारी (वय 41, रा. शेवाळवाडी, पुणे) या सराईत गुन्हेगाराला अखेर गजाआड केले आहे.
त्याच्यावर एकूण ७ गुन्हे मटका जुगार चालवण्याचे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असून, जामीनावर सुटताच तो पुन्हा मटका व्यवसाय सुरू करीत होता. वारंवार गुन्हे करून समाजात दहशत निर्माण करणारा व सार्वजनिक सुव्यवस्थेस धोकादायक असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यावर एम.पी.डी.ए. (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत १ वर्षे स्थानबद्ध करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिले असून, आरोपीला मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे रवाना करण्यात आले.
ही कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि हडपसर पोलीस पथकाच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली.
#BreakingNews #PunePolice #HadapsarPolice #MPDAAction #CrimeControl #PuneCity #PoliceAction #MatkaRaid #GamblingRaid #LawAndOrder








