वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी — लोणावळ्यातून टेम्पो चोरटा अटकेत! चोरीस गेलेला 2.5 लाखांचा मिनी टेम्पो हस्तगत!


🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴

वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी — लोणावळ्यातून टेम्पो चोरटा अटकेत! चोरीस गेलेला 2.5 लाखांचा मिनी टेम्पो हस्तगत!

वानवडी पोलीस तपास पथकाने अतिशय शिताफीने सापळा रचून लोणावळ्यातून टेम्पो चोरट्याला अटक केली असून, ₹2,50,000 किंमतीचा अशोक लेलॅन्ड दोस्त मिनी टेम्पो (MH 14 GD 4823) ताब्यात घेतला आहे.

📌 प्रकरण असे —

दि. 22/08/2025 ते 23/08/2025 दरम्यान हडपसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलसमोर पार्क केलेला मिनी टेम्पो अज्ञात चोरट्याने लंपास केला होता.

फिर्याद शाहरुख शब्बीर शेख यांनी दिली होती.

📌 तपास पथकाची जबरदस्त मेहनत —

➡️ घटनास्थळापासून चाकणपर्यंत तब्बल 300–320 CCTV फुटेजची तपासणी

➡️ गुप्त बातमीवरून लोणावळ्यात शोध

➡️ रात्री सापळा रचून टेम्पो सुरू करण्याच्या तयारीत असलेला चोरटा ताब्यात!

📌 अटक आरोपी —

गणेश शंकर पवार (वय 25, रा. लोणावळा)

त्याने कबुली दिली की, तीन महिन्यांपूर्वी तो आणि त्याचा साथीदार श्रवण वाघमारे यांनी हडपसरहून टेम्पो चोरी करून लोणावळ्याला आणला आणि तो भंगार गोळा करण्यासाठी वापरत होते.

📌 हस्तगत मुद्देमाल —

✔️ 1 आयरीश ग्रीन रंगाचा दोस्त मिनी टेम्पो

✔️ किंमत : ₹2,50,000/-

📌 सहकारी आरोपी श्रवण वाघमारे फरार —

त्याचा पोलिसांकडून जोरदार शोध सुरू.

📌 या उत्तम कारवाईचे मार्गदर्शन —

👉 डॉ. राजकुमार शिंदे (उप-आयुक्त, सो. परिमंडळ 5)

👉 सौ. नम्रता देसाई (सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग)

👉 श्री. भाऊसाहेब पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

👉 श्री. विजयकुमार डोके (पोलीस निरीक्षक, गुन्हे)

📌 कारवाई करणारे तपास पथक —

स.पो.नि. उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख आणि पथकातील पोलीस अंमलदार:

दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर

👉 वानवडी पोलिसांच्या या वेगवान आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक!


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!