ब्रेकिंग न्यूज
कोहिनूर हॉटेलच्या मालकाकडे तब्बल १८ कोटींची खंडणी मागणी!
एम.जी. रोडवरील अकबर रेडीयन प्लाझा येथे घडलेला हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोहिनूर हॉटेलचे मालक अली अलीअबकर जाफरी (वय ६४) यांच्याकडे बनावट दस्तऐवजांच्या आधारे भारतात वास्तव्याचा आरोप मागे घेण्यासाठी १८ कोटी रुपये खंडणी मागण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे.
फिर्यादीनुसार,
❗ पैसे न दिल्यास पोलिसांमार्फत त्रास देण्याची धमकी
❗ मालमत्ता विक्रीस भाग पाडण्याचा प्रयत्न
❗ २०२४ पासून आजतागायत सुरू असलेला दबाव
या प्रकरणी समिर मोतीलाल मुजुमदार (वय ४९) याच्याविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. ३०८(२)(३), ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📍 घटना – ऑफिस नं. २०३ व २०४, अकबर रेडीयन प्लाझा, एम.जी. रोड
📍 तक्रारदार – अली अलीअबकर जाफरी
Hashtags:
#BreakingNews #PuneCrime #ExtortionCase #18CroreDemand #KohinoorHotel #LashkarPolice #MGRoad #PuneNews #CrimeUpdate #PoliceAction








