अंमली पदार्थ विरोधी पथक- 2, गुन्हे शाखा पुणे शहराने येरवडा पोलीस ठाणे हद्दीत मोठी धाड टाकली. तब्बल ₹20,70,500/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त!


🔴 ब्रेकिंग न्यूज – येरवड्यात मोठी कारवाई! 🔴

अंमली पदार्थ विरोधी पथक- 2, गुन्हे शाखा पुणे शहराने येरवडा पोलीस ठाणे हद्दीत मोठी धाड टाकली. तब्बल ₹20,70,500/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त!

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दि. 24/11/2025 रोजी वरिष्ठांचे आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना पथक 2 च्या टीमला नाईकनगर, वेद प्रोव्हिजन स्टोअर्सजवळील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आढळून आला.

कारवाईत आरोपी जमनाराम उर्फ गणेश बलराम जाट (वय 25) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण ₹20,70,500/- किंमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

घटनेप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच COTPA व FSSAI कायद्यान्वये गुन्हा दाखल.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पथकातील अंमलदारांचे मोलाचे योगदान.

#BreakingNews #Yerwada #PunePolice #CrimeBranch #AntiNarcotics #GuthkaSeizure #PuneCity #PoliceAction #IllegalTobacco #MNC #CrimeUpdate #PuneBreaking #ACP #DCP #PuneNews #MaharashtraPolice #LawAndOrder


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!