ब्रेकिंग न्यूज – भाग्योदयनगरमध्ये ड्रेनेजची भीषण अवस्था, नागरिकांचा राग उफाळला!


 

🛑 

ब्रेकिंग न्यूज – भाग्योदयनगरमध्ये ड्रेनेजची भीषण अवस्था, नागरिकांचा राग उफाळला!

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भाग्योदयनगर गल्ली क्र. 3 मधील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. फुटलेली चेंबर्स, झाकण नसलेले खोल खड्डे – याठिकाणी लहान मुले, दुचाकीस्वार पडून गंभीर अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे.

नागरिकांनी आरोग्य विभाग, ड्रेनेज विभागास वारंवार तक्रारी करूनही शासन शांत, काम शून्य!

आता संतप्त नागरिकांचा सवाल –

“एखादा जीव गेला तरच प्रशासन जागणार का?”

स्थानिकांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांना निलंबित करून सक्षम कर्मचारी देण्याची कडक मागणी केली आहे.

त्वरित कारवाई न झाल्यास शिष्टमंडळ घेऊन पुणे महापालिका आयुक्तांकडे धडकणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

🔥 

#BreakingNews #भाग्योदयनगर #वानवडी #रामटेकडी #PMC #DrainageIssue #NagarikSantap #PuneNews #Manpa #CivicNegligence #SafetyFirst #PublicVoice #AdministrationAccountable #PuneLive #PuneUpdates #LocalNews #SocialIssue #ActionNow


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!