मोक्यातील गंभीर गुन्ह्यात मोठा ब्रेकथ्रू! गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या आरोपीस अखेर बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कैद्यावर थेट तलवार, कोयता व पिस्टलसारख्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करण्याच्या थरारक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.


🚨🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨🚨

मोक्यातील गंभीर गुन्ह्यात मोठा ब्रेकथ्रू!

गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार असलेल्या आरोपीस अखेर बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कैद्यावर थेट तलवार, कोयता व पिस्टलसारख्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करण्याच्या थरारक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे मोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील कैदी तुषार हनुमंत हंबीर यांच्यावर दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी ससून हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर पाच अज्ञात आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. या हल्ल्यात फिर्यादीला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलीस गार्ड व नातेवाईकांवरही कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले होते. तसेच आरोपींपैकी एकाने पिस्टलने गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण रुग्णालय परिसरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४०/२०२२ अन्वये भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३३२, १२०(ब), १४१ ते १४९ तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान एकूण १२ आरोपी निष्पन्न करून त्यातील ११ आरोपींना अटक करत त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली होती.

मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे (वय २६, रा. वडारवाडी, पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त मा. संगिता शिंदे अल्फोन्सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केसनंद, वाघोली परिसरातून दि. १२/१२/२०२५ रोजी पहाटे अटक केली.

आरोपीस विशेष मोका न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. १७ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे व कौशल्यपूर्ण तपासाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

🔥 Hashtags 🔥

#BreakingNews #PunePolice

#BundGardenPolice #MCOCA

#FugitiveArrested #PoliceBreakthrough

#SassoonHospitalAttack

#CrimeNews #PuneCity

#LawAndOrder #OrganisedCrime

#Wagholi #KesariNand


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!