🚨 ब्रेकिंग न्यूज | आंबेगाव खून प्रकरणाचा छडा 🚨
आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी फरार आरोपींना नांदेड येथून जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक येथे काम करत असताना जावेद खादमियाँ पठाण (वय ३४) याच्यावर प्रेमसंबंधाच्या रागातून लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावेद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. तपासात हे आरोपी मूळ भोकर, नांदेड येथील असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या.
👮♂️ पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने नांदेड येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना अटक केली.
🔴 अटक आरोपी :
- संदिप रंगराव भुरके (वय २५)
- ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०)
रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, जि. नांदेड
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर गु.र.नं. ३६५/२०२५ अन्वये
भा.न्या.सं. कलम १०३(१), ३(५), आर्म अॅक्ट ४(२५), मपोअधि ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरूच आहे.
🔖 #Hashtags
#AmbegaonPolice #PuneCrime #BreakingNews #MurderCaseSolved
#AccusedArrested #NandedOperation #LoveAffairDispute #CrimeNewsMarathi
#PunePolice #JusticeForJaved #MaharashtraPolice








