युनिट–३ गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – २२ वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्टल, मॅगझीन व ३ जिवंत काडतुस जप्त!


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨

युनिट–३ गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – २२ वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्टल, मॅगझीन व ३ जिवंत काडतुस जप्त!

दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट–३ च्या पथकाने दत्तवाडी, टिळक रोड परिसरात सापळा रचून मोठी कारवाई केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पुर्वेश उर्फ सार्थक दिनेश चव्हाण (वय २२, रा. शुक्रवार पेठ) याच्याकडे अवैधरित्या बेकायदेशीर शस्त्र बाळगले असल्याचे निष्पन्न झाले.

भारत पेट्रोल पंपासमोरील गल्ली, टिळक रोड येथे त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून

➡️ ०१ गावठी पिस्टल

➡️ ०१ खाली मॅगझीन

➡️ ०३ जिवंत काडतुस

असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कारवाईसाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त श्री. निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने व युनिट–३ गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

🔖 Hashtags

#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #Unit3 #IllegalWeaponSeized

#DesiPistol #TilakRoad #Dattawadi #FridayPeth #KhadakPolice

#PoliceAction #PuneCity #LawAndOrder #CrimeFreePune


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!