पुणे : दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॅम्प भागात असलेल्या कुमार पॅलेस येथील गाळा क्र. २८ मध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करणारे सादिक हुसेन कपुर (वय ५७, रा. सय्यद नगर, हडपसर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे कॅम्पमधील आत्महत्येप्रकरणी गंभीर खुलासा 🚨

पुणे : दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॅम्प भागात असलेल्या कुमार पॅलेस येथील गाळा क्र. २८ मध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करणारे सादिक हुसेन कपुर (वय ५७, रा. सय्यद नगर, हडपसर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून, मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार प्रॉपर्टी वादातून काही व्यक्तींनी सतत ५० लाख रुपयांची मागणी करून आर्थिक व मानसिक छळ केल्यामुळे वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ०५/२०२६ अन्वये चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३०८(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन करत आहेत.

🔖 हॅशटॅग्स

#BreakingNews #PuneCrime #CampPune #LashkarPolice #SuicideCase #PropertyDispute #50LakhDemand #MentalHarassment #AbetmentToSuicide #PuneNews #CrimeUpdate

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!