ससून परिसरात एम.डी. ड्रग्स विक्रीचा भांडाफोड, मुंबईतील तरुणास ₹1.66 लाखांच्या अमली पदार्थांसह रंगेहात अटक


 

पुणे शहरातील ससून रुग्णालय रोडवर इन-गेट व आऊट-गेटदरम्यान असलेल्या सार्वजनिक मुतारीसमोरील फुटपाथवर उभा राहून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका तरुणास बंडगार्डन पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ₹1,66,300/- किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) व विविध रंगांच्या अमली गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ससून परिसरातील वाढती अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आली असून शहरातील ड्रग्स माफियांना मोठा धक्का बसला आहे.

अटक आरोपीचे नाव राकेश रामविलास गौतम (वय २६ वर्षे) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो मुंबई येथील सांताक्रूझ (पश्चिम) – खोतवाडी परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो पुण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी थांबून एम.डी. व अमली गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक-१ येथील पोलीस हवालदार निलेश जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून
➡️ ₹1,06,600 किमतीचे 5.33 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.)
➡️ ₹59,700 किमतीच्या गुलाबी, निळ्या व जांभळ्या रंगांच्या विविध आकारांच्या अमली गोळ्या
असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा सर्व अंमली पदार्थ विक्रीसाठीच बाळगण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम 8(क), 21(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी कोणत्या मोठ्या टोळीशी संबंधित आहे का, पुणे-मुंबई ड्रग्स साखळी कोण चालवत आहे, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

🔖 Hashtags

#PuneBreaking #SassoonHospital #BundGardenPolice #PunePolice #DrugBust #MDDrugs #Mephedrone #NarcoticsRaid #NDPSAct #PuneCrime #CrimeBranch #DrugTrafficking #AntiNarcotics #MaharashtraPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!