चमाडीया गोडाउन चोरी प्रकरण उघडकीस! 72 तासांत पोलिसांचा मोठा ब्रेकथ्रू – ₹68 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे ग्रामीण – रांजणगाव एमआयडीसी

चमाडीया गोडाउन चोरी प्रकरण उघडकीस! 72 तासांत पोलिसांचा मोठा ब्रेकथ्रू – ₹68 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

रांजणगाव एमआयडीसीतील चमाडीया गोडाउनमधून आयटीसी कंपनीचे सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर मौल्यवान मालाची थरारक चोरी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणत मोठा गुन्हा उधळून लावला आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ₹68,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 6.40 वाजता, चमाडीया गोडाउनमध्ये ट्रान्सपोर्टसाठी रात्री भरून ठेवलेला मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि. चा इलेक्ट्रिक पिकअप अज्ञात चोरट्याने चालू करून, गेटवर चलन नोंदवून थेट पळवून नेला होता. या पिकअपमध्ये सुमारे ₹65,98,897/- किमतीचा माल होता. याबाबत गु. र. नं. 478/2025, भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात चोरट्यांनी काही अंतरावर पिकअप सोडून देत, त्यातील ₹54,53,000/- किमतीची सिगारेट दुसऱ्या वाहनातून चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक CCTV फुटेज तपासले. यावेळी वाघोली परिसरात संशयित वाहन शोधताना पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी ते वाहन कावेरी हॉटेल, वाघोली येथे डिलिव्हरी करताना पकडले.

कौशल्यपूर्ण चौकशीत सुपरवायझर प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण याने आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यावरून प्रथमेश चव्हाण यास अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी दिपक ढेरंगे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे ८ गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोसई अविनाश थोरात व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली आहे.

🔴 #BreakingNews

#RanjangaonMIDC #PuneRuralPolice #WarehouseTheft #68LakhsSeized #CrimeNews #PoliceBreakthrough #CCTVTracking #LogisticsTheft #IndustrialCrime #PuneRural #PoliceAction #MarathiNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!