🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे – आंबेगाव
प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाचा निर्घृण खून! आरोपी नांदेडमधून जेरबंद, आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई
आंबेगाव बुद्रुक परिसरात खळबळ उडवणाऱ्या खुनाच्या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा नांदेड येथून शोध घेऊन त्यांना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता, गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक येथे काम करत असताना जावेद खादमियाँ पठाण (वय ३४) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जावेदच्या मैत्रिणीचा भाऊ संदिप रंगराव भुरके (वय २५) व त्याचा साथीदार ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०) यांनी प्रेमसंबंधाचा राग मनात धरून लोखंडी हत्याराने जावेदच्या डोक्यावर व हातावर वार करत त्याला गंभीर जखमी केले व घटनास्थळावरून फरार झाले.
उपचारादरम्यान जावेदचा मृत्यू झाल्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५), आर्म अॅक्ट ४(२५), मपोअधि कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात आरोपी मूळचे भोकर, नांदेड येथील असल्याचे निष्पन्न होताच, पो.उपनि. मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक नांदेडला रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोकर व नांदेड शहर परिसरात शोध घेऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना आंबेगाव पोलीस ठाण्यात आणून पुढील तपास सुरू करण्यात आला असून मा. न्यायालयाने त्यांना दि. ०१/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले व आंबेगाव पोलिसांच्या पथकाने केली आहे.
🔴 #BreakingNews
#AmbegaonPolice #PuneCrime #MurderCase #NandedArrest #LoveAffairMurder #CrimeNews #PoliceAction #PunePolice #JusticeForJaved #MaharashtraPolice #LawAndOrder #CrimeUpdate








