“काम बोलताय” फेम माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या बालेकिल्ल्यातील कोंढव्यात मनपाचा आरोग्य दवाखाना झाला दारुड्यांचा अड्डा!


🚨 ब्रेकिंग न्यूज – कोंढवा हादरला! 🚨

“काम बोलताय” फेम माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या बालेकिल्ल्यातील कोंढव्यात मनपाचा आरोग्य दवाखाना झाला दारुड्यांचा अड्डा!

महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दवाखान्याच्या आवारात दारूच्या बाटल्या, कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “आरोग्य जपण्याऐवजी आरोग्य बिघडवण्याचा हा खेळ चाललाय का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

दवाखान्यात उपचाराऐवजी दारुड्यांचे टोळके, भिंतीलगत पडलेल्या रिकाम्या बाटल्या, घाणीचे ढीग आणि कोणतीही सुरक्षा नसलेले आवार – यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे. “मनपा आरोग्य विभाग झोपला आहे का?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

#️⃣ Hashtags:

#KondhwaBreaking #आरोग्यदवाखाना_दारुड्यांचा_अड्डा #महिला_रुग्ण_असुरक्षित #PMCNegligence #आरोग्यविभाग_झोपला_का #हाजीगफूरपठाण #PublicHealthCrisis #PuneNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!