🚨 ब्रेकिंग न्यूज – शेतकऱ्यांना दिलासा! 🚨
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई!
शेतकऱ्यांचे शेळी-बोकडे मोटारसायकलवर येऊन चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक करत तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा, वाघाळे आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या या टोळीमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.
पोलिसांनी १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) व सुनिल अण्णाभाऊ माळी (वय २४) रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांना अटक केली.
आरोपींकडून ५ बोकडे, १ शेळी, तसेच चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ₹१,१५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेली जनावरे शेतकऱ्यांना परत मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
ही धडाकेबाज कारवाई मा. पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या तपास पथकाने केली.
#️⃣ Hashtags:
#RanjangaonMIDCPolice #SheliBokadChori #5CrimesSolved #ShetiSuraksha #PuneRuralPolice #CrimeNews #FarmersRelief #MaharashtraNews








