🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे कॅम्प 🚨
एम. जी. रोडवरील ‘मेड फॉर मेन’ कपड्यांचे दुकान फोडणारी टोळी लष्कर पोलीसांच्या जाळ्यात – ₹3.05 लाखांचा मुद्देमाल जप्त!
दि. ०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी राकेश काशिनाथ अल्लु (रा. सोमवार पेठ, पुणे) यांनी एम. जी. रोड, कॅम्प येथील मेड फॉर मेन कपड्यांच्या दुकानातून ₹५८,०००/- किमतीचे महागडे कपडे चोरीस गेल्याची तक्रार लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ–०५ व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार व तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करत निर्मल सोनार याच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून –
🔹 चोरीत वापरलेल्या २ दुचाकी
🔹 इतर गुन्ह्यातील १ लॅपटॉप
🔹 ए.सी. साठी वापरली जाणारी तांब्याची पाईप
🔹 चोरीसाठी वापरलेली लोखंडी कटावणी
🔹 चोरी केलेले कपडे
असा एकूण ₹३,०५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या टोळीने कॅम्प परिसरात लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
🔖 हॅशटॅग्स
#BreakingNews #PunePolice #LashkarPolice #MGroad #CampPune #ShopBreak #TheftGang #CrimeControl #PuneCity #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice








