🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे 🚨
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई – गावठी कट्टा व जिवंत राऊंडसह १९ वर्षीय तरुण अटकेत!
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर अंतर्गत दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून नवले पुल ते कात्रज रोडवरील राजमाता उद्यानासमोरील सर्व्हिस रोड येथे सापळा रचून अभिषेक कैलास दांगट (वय १९ वर्षे, रा. तानाजी नवले इंडस्ट्रीज रोड, पुणे) यास अटक करण्यात आली.
आरोपीकडून अंदाजे ₹५०,०००/- किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व १ जिवंत राऊंड जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ०३/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.
🔖 हॅशटॅग्स
#BreakingNews #PunePolice #BhartiVidyapeethPolice #GunSeized #IllegalWeapon #CrimeControl #PoliceAction #PuneCity #PublicSafety #MaharashtraPolice #Katraj #NavaleBridge #LawAndOrder








