आंबेगाव पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी बतावणी करून मंगळसूत्र घेऊन जाणाऱ्या परराज्यातील महिलांना 24 तासात निष्पन्न करून मंगळसूत्र केले हस्तगत


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

🔹 फसवणुकीने मंगळसुत्र नेणाऱ्या परराज्यातील दोन महिला २४ तासात पोलिसांच्या ताब्यात! 🔹

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन अनोळखी महिलांनी एका महिलेला फसवून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र (किंमत ₹1,02,000) घेऊन पसार झाल्या होत्या 😱💍

पोलीसांनी तत्परता दाखवत कात्रज ते सासवड मार्गावरील ५० पेक्षा अधिक CCTV कॅमेरे तपासले आणि आरोपी सासवड येथे असल्याचे निष्पन्न झाले. बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन्ही आरोपी महिला —

1️⃣ आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०)

2️⃣ सोनूबेन आकाशभाई सरवय्या (वय ३०)

रा. सासवड, मूळ रा. भावनगर, गुजरात — यांना अटक केली आणि फिर्यादीचे मंगळसुत्र हस्तगत केले 👮‍♀️💪

ही कारवाई मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली

सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, राजेश बनसोडे, मिलींद मोहिते, राहुल आवारे यांच्या नेतृत्वात

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने केली 👏

पथकातील प्रमुख अधिकारी —

पो.उ.नि. मोहन कळमकर, पो.अं. प्रमोद भोसले, शिवाजी पाटोळे, दिक्षा मोरे व इतरांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली 🏅

#BreakingNews #PunePolice #AmbegaonPolice #CrimeNews #MangalSutraRecovered #PoliceAction #PuneCrimeUpdate


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!