🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨
आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची जबरदस्त धडक कारवाई; दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधात गुन्हे शाखेने आक्रमक भूमिका घेत आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. खंडणीविरोधी पथक–२, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४९/२०२४ अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य नागे गणेश उर्फ सूरज अशोक वड्या (वय ३०, रा. मंगळवार पेठ, पुणे) याला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातून सापळा रचून अटक केली.
याच कारवाईदरम्यान नानापेठ परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे जांदेकर/आंदेकर टोळीशी संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून गावठी बनावटीची पिस्टल, एअर पिस्टल, धारदार शस्त्रे, रोख रक्कम व दुचाकी असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात आंदेकर टोळीशी संबंधित गुंडांच्या निवासस्थानी झडती घेतली असता रोख रक्कम, चांदीचे दागिने, मालमत्ता व बांधकाम व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे, करारनामे व इतर महत्वाचा ऐवज असा तब्बल ३६ लाख ६७ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे पुणे शहरातील गुंडगिरी, खंडणी व बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर मोठा आघात बसला असून, संघटित गुन्हेगारीविरोधात पुणे पोलिसांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त, मा. अपर पोलीस आयुक्त व गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट–१ च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.
🔴 पुणे पोलिसांचा स्पष्ट इशारा — गुंडगिरी, खंडणी व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना शहरात जागा नाही!
#ब्रेकिंगन्यूज #पुणे #गुन्हेशाखा
#आंदेकरटोळी #खंडणीविरोधीपथक
#संघटितगुन्हेगारी #MCOCA
#पुणेपोलीस #CrimeNews
#PoliceAction #ActionMode 🚓🔥








