बाणेर पोलिसांची मोठी कामगिरी! घरफोडी करणारा सराईत आरोपी अटक — सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त!


🔺 ब्रेकिंग न्यूज 🔺

बाणेर पोलिसांची मोठी कामगिरी!

घरफोडी करणारा सराईत आरोपी अटक — सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त!

बाणेर येथील विरभद्रनगर, लेन नं. ११ मधील घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन उर्फ चेत्या वाघमारे याला अखेर बाणेर पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी घराचे लॉक तोडून ४.५ तोळे सोन्याचे मंगळसुत्र आणि ₹५०,000 रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती.

तपास पथकाने ८८ सीसीटीव्ही फुटेज तपासून, गोपनीय बातमीदाराच्या मदतीने आणि विशेष कौशल्य वापरून आरोपींना काळेवाडी येथून अटक केली. पहिल्या दोन आरोपींपासूनच मोटारसायकल व ₹३८,००० जप्त केले होते. अखेर मुख्य आरोपी चेतन वाघमारेला देखील १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पकडत गुन्ह्यातील ४० ग्रॅम १४० मिग्रॅ वजनाचे मंगळसूत्र जप्त करण्यात पोलिसांना यश.

अटक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चोरी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिसांनी यशस्वीरीत्या उघडकीस आणली आहे.

#BreakingNews #BanerPolice #CrimeDetection #GoldRecovery #HouseBreaking #PunePolice #CrimeUpdate #BanerNews #PCMC #PoliceAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!