ब्रेकिंग न्यूज – भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
दिनांक : २१/११/२०२५
पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून चुलत भावाचा निर्घृण खून; आरोपीस ३६ तासांत बेड्या – भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कामगिरी
कात्रज-खोपडेनगर परिसरातील तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना अवघ्या ३६ तासांत खून उघडकीस आणत आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश.
मिसिंगमधून खून, आणि डोंगरात फेकलेला मृतदेह—धक्कादायक खुलासा!
१७ नोव्हेंबर रोजी कामगार अजयकुमार गणेश पंडीत (२२) भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर गेला व परत आला नाही. मिसिंग नोंदवल्यानंतर तपासदरम्यान अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत याच्यावर संशय निर्माण झाला. तांत्रिक विश्लेषणानंतर त्याला पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने कबुली दिली की—
➡️ पत्नीचे अजयकुमारसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय
➡️ १७ नोव्हेंबर रात्री ९.३० वाजता खोपडेनगर डोंगरावर नेले
➡️ गळा चिरून व पोटावर वार करून हत्या
➡️ मृतदेह गोणीत ठेवून गुजर-निंबाळकरवाडी डोंगरात फेकून दिला
अशोकच्या दाखवलेल्या जागेवरून पोलिसांना गोणीमध्ये भरलेला मृतदेह झाडाझुडपातून मिळाला. आरोपीला तात्काळ अटक.
ही संपूर्ण कारवाई ३६ तासांत पूर्ण करत भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेली मोठी कामगिरी.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त)
मा. रंजनकुमार शर्मा (सह आयुक्त)
मा. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त)
मा. मिलिंद मोहिते (उप आयुक्त, परिमंडळ २)
मा. राहुल आवारे (सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)
कारवाई करणारे पथक:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे
स.पो.नि. स्नेहल थोरात, समीर शेंडे, स्वप्नील पाटील
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव
अंमलदार : महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले,
संदीप आगळे, तुकाराम सुतार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी,
सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे,
नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे
#BreakingNews #PunePolice #BharatiVidyapeethPolice #MurderCaseSolved #PoliceAction #CrimeNews #PuneCity #PoliceInvestigation #36HoursChallenge #PCPCrimeBranch








