बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र महासचिव आणि पूर्णवेळ कार्यकर्ते किरण पोपटराव आव्हाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉


बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र महासचिव आणि पूर्णवेळ कार्यकर्ते किरण पोपटराव आव्हाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांचे मिशन आयुष्यभर जोपासणारे, विवाह न करता संपूर्ण वेळ समाजकार्यास वाहून घेतलेले किरण आव्हाड यांचे कार्य बहुजन चळवळीत आदर्शवत मानले जाते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम आणि बहन मायावती यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, किरण आव्हाड गेली अनेक वर्षे बहुजन समाज पक्षाची धुरा प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. जिथे संघटन नाही तिथे जाऊन संघटन उभी करणारा हा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत अग्रभागी आहे.

दुसऱ्या पिढीतील कार्यकर्ते असलेल्या किरण आव्हाड यांच्या वडिलांनी — पोपटराव आव्हाड यांनी बामसेफ, DS4 आणि मान्यवर कांशीराम यांच्या सामाजिक–राजकीय चळवळींमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत किरण आजही समाजकारणात सक्रिय आहेत.

त्यांचे सहकारी आणि रिपब्लिकन विचारवंत मित्रांनी सांगितल्याप्रमाणे —

“मी येरवडा जेल पाहिले ते किरण आव्हाडमुळेच. विद्यार्थी आंदोलनात आम्ही एकत्र कारावास भोगला, पण व्यवस्थेला शरण जाणे आम्हा दोघांनाही जमले नाही.”

अशी निस्वार्थ, त्यागमय आणि समर्पित कार्यकर्त्याची ओळख असलेले किरण आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बहुजन समाज आणि सहकारी कार्यकर्त्यांकडून लक्ष लक्ष शुभेच्छा 🎂💐

#BreakingNews #BahujanSamajParty #KiranAwhad #AmbedkarMission #FullTimeWorker #SocialService #PuneNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!