🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴
बंडगार्डन पोलीसांची धडाकेबाज कारवाई!
दरोड्याची तयारी करणाऱ्या ३ सराईत आरोपींना ताब्यात घेत दरोड्याचे साहित्य व ६ चोरीचे मोबाईल फोन असा एकूण ₹32,160/- किंमतीचा मुद्देमाल जप्त!
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जुने रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक, पुणे येथे अचानक छापा टाकण्यात आला. तेथे दरोडा टाकण्यासाठी तयारीत असलेले तिघे इसम—
- जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (३२)
- सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (३५)
- शिव प्रकाश कुमार (२३)
यांना अचूक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
अंगझडतीत दरोड्याचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन मिळाल्याने आरोपींवर गु.र.नं. 352/2025 अन्वये गुन्हा दाखल. पुढील तपासात आरोपींकडून गु.र.नं. 350/2025 मधील चोरीचा गुन्हा देखील उघडकीस!
ही कारवाई
मा. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे,
मा. पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते,
मा. सहा. पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाने केली.
कारवाईत प्रामुख्याने सहभाग :
पीएसआय धिरज गुप्ता व पथकातील अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सुर्यकांत राणे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू धुलगुडे यांचा होता.
#BreakingNews #PunePolice #BundGardenPolice #CrimeControl #PoliceAction #DacoityFoiled #PuneCity #MaharashtraNews #PoliceSuccess #CrimePrevention








