चंदननगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ₹२५,००,०००/- किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करून मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले आहे.


🚨 ब्रेकिंग NEWS | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨

चंदननगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ₹२५,००,०००/- किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करून मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले आहे.

🔴 

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ पार्श्वभूमीवर वाढलेली सतर्कता

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ कडून नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

🔎 

फार्महाऊसवर छापा – मोठा साठा जप्त

योगी आईसक्रीम फॅक्टरीजवळ, सोपान नगर, वडगावशेरी रोड, पुणे येथील सायरस पेडर यांच्या फार्महाऊसमध्ये रतननाथ मोहननाथ योगी उर्फ महाराज (मुळ रहिवासी राजस्थान) हा इसम मोठ्या प्रमाणावर एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने तात्काळ धाड टाकून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

💥 

कारवाईत हस्तगत मुद्देमाल

🔹 १२० ग्रॅम ७९ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) – किंमत ₹२५ लाख

🔹 इलेक्ट्रॉनिक वजनकाटा

🔹 अँड्रॉईड मोबाईल फोन

🔹 रोख रक्कम

⚖️ 

एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशन येथे

गु.र.नं. ११/२०२६, एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट कलम ८(क), २१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👮‍♂️ 

कारवाई करणारे पथक

पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड,

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक,

पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड,

पोलीस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी ही यशस्वी कारवाई केली.

🏆 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार,

मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा,

मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,

मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे,

मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

🔥 पुणे पोलिसांचा इशारा – ड्रग्स माफियांना आता खैर नाही! 🔥

📌 #Hashtags

#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #AntiNarcoticsSquad #MDDrugs #Chandannagar #DrugFreePune #NDPSAct #BigAction #PuneCityPolice #PMC_Election2026 #WarOnDrugs #PoliceAction #CrimeNews #PuneBreaking


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!