चतुःश्रृंगी पोलीसांची मोठी कारवाई – दहशत माजविणाऱ्या व अवैध धंदे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार!


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

चतुःश्रृंगी पोलीसांची मोठी कारवाई – दहशत माजविणाऱ्या व अवैध धंदे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार!

पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणारे तसेच अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेले अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

लक्ष्मण ऊर्फ नाना अंकुष पवार (वय ४४, रा. औंध) यास मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१)(अ)(ब) अंतर्गत २ वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असून दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे आदेशाची बजावणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे अजिंक्य आशोक बोबडे (वय १९, रा. विधाते वस्ती / सध्या नवी सांगवी) यास देखील त्याच कायद्यांतर्गत १ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचीही दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत बजावणी करण्यात आली.

ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पवित्रा घेतल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

🔖 #Hashtags

#BreakingNews #PunePolice #ChaturshringiPolice #TadiparAction #CrimeControl #LawAndOrder #PuneCity #PoliceAction #MaharashtraPolice #CrimeFreePune #PublicSafety


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!