युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी देशी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला जेरबंद केले आहे.


🔴 ब्रेकिंग न्यूज – पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई! 🔴

युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी देशी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला जेरबंद केले आहे.

दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कोंबडी पुल, जन्म-मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ मंगळवार पेठ येथे एका संशयितावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

📌 अटक आरोपी:

रमजान उर्फ टिपु आदम पटेल (वय 33 वर्षे)

रा. भाजी बाजार, शिरुर, पुणे

📌 जप्त मुद्देमाल:

  • गावठी पिस्टल — किंमत ₹50,000
  • जिवंत काडतूस — किंमत ₹1,000

📌 आरोपी हा पिस्टल कमरेला खोचून कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर युनिट १ च्या पथकाने झडप टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक 215/2025 आर्म्स अॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा नोंद.

📌 ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख
  • मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे
  • मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ श्री. विजय कुंभार

📌 कारवाई करणारे पथक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उप-निरीक्षक राहुल मखरे,

पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, निलेश साबळे, शशीकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयुर भोसले, सिद्धेश्वर वाघमारे, उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ, मयुरी जाधव यांनी संयुक्तरित्या ही धडाकेबाज कारवाई केली.

🔻 पुणे गुन्हे शाखेची ही कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस सतत सज्ज आहेत!

#BreakingNews #PunePolice #CrimeBranch #Unit1 #PistolSeizure #PoliceAction #PuneCity


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!