⚠️ ब्रेकिंग न्यूज | आत्महत्येप्रकरणात फारुक इनामदार यांचे नाव ठळकपणे समोर ⚠️
पुणे : कॅम्प येथील कुमार पॅलेस, गाळा क्र. २८ मध्ये रिअल इस्टेट व्यवसायिक सादिक हुसेन कपुर (वय ५७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार प्रॉपर्टी वादातून सातत्याने ५० लाख रुपयांची मागणी करून आर्थिक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात फारुक यासीन इनामदार (PMC निवडणूक २०१७ मधील उमेदवार) यांचे नाव ठळकपणे समोर आले आहे.
या तक्रारीवरून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ०५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३०८(२), ३(५) अन्वये फारुक इनामदार यांच्यासह इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन करत आहेत.
🔖 हॅशटॅग्स
#BreakingNews #FarukInamdar #PMC2017 #PuneCrime #LashkarPolice #SuicideCase #PropertyDispute #50LakhDemand #MentalHarassment #AbetmentToSuicide #PuneNews








