फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. क्र. 388/2025 (I.P.C कलम 137(2)) मधील अपहृत 14 वर्षीय मुलाचा फक्त 48 तासांत शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश!


📢 ब्रेकिंग न्यूज – फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! 📢

फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. क्र. 388/2025 (I.P.C कलम 137(2)) मधील अपहृत 14 वर्षीय मुलाचा फक्त 48 तासांत शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश!

अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची नोंद 16/11/2025 रोजी झाली होती. मुलाकडे कोणतेही संपर्क साधन नसल्याने तपासात अनेक अडचणी येत होत्या. तरीही वरिष्ठांच्या सूचनांनुसार पो.उ.नि. बापुसाहेब खंदारे हे तपास करत असताना एक महत्त्वाचा धागा मिळाला की मुलगा मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथे असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौ. राजाराम फडतरे व पोलीस शिपाई पोमण यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मस्साजोग परिसरात शोध मोहिम राबविताना एक मुलगा फिरताना दिसला. खातरजमा केली असता तोच अपहृत बालक असल्याची पुष्टी झाली.

चौकशीत मुलाने सांगितले की आईने मोबाईल न दिल्याच्या रागातून तो घराबाहेर पडला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुखरूप आईकडे सोपवले.

ही उल्लेखनीय कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

🔹 डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५

🔹 अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग

🔹 अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन

🔹 राजेश खांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)

🔹 पोउनि बापुसाहेब खंदारे, तपास अधिकारी

🔹 सहा. फौ. राजाराम फडतरे

🔹 पोलीस शिपाई पोमण

फुरसुंगी पोलिसांनी कोणताही सुगावा नसतानाही कसोशीने तपास करून अल्पवयीन मुलाचा शोध लावून प्रशंसनीय कार्य केले आहे.

📌 अपहृत मुलास सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पो.उ.नि. बापुसाहेब खंदारे करत आहेत.

फुरसुंगी पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक! 🚨👏


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!