सोन्या-चांदीचे दागिने “पॉलिश करून देतो” असे सांगून नागरिकांना गंडा घालणाऱ्या परराज्यातील लुटारू टोळीला पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी अटक करून मोठा फसवणूक प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोने व पॉलिश साहित्य असा एकूण ₹२,५०,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


🚨 ब्रेकिंग NEWS | पर्वती पोलिसांची मोठी कारवाई 🚨

सोन्या-चांदीचे दागिने “पॉलिश करून देतो” असे सांगून नागरिकांना गंडा घालणाऱ्या परराज्यातील लुटारू टोळीला पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी अटक करून मोठा फसवणूक प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोने व पॉलिश साहित्य असा एकूण ₹२,५०,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔴 

दांडेकर पुल परिसरात घडलेला प्रकार

दि. २१/१२/२०२५ रोजी दांडेकर पुलाजवळ, जयमहाराष्ट्र मित्रमंडळ परिसरात फिर्यादी यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी विश्वास संपादन करून हातचलाखीने दोन सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या.

या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन येथे

गुन्हा रजि. नं. ४०२/२०२५

भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

🔍 

CCTV व गुप्त बातमीदारांच्या मदतीने टोळीचा पर्दाफाश

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून परराज्यातील ५ जणांच्या टोळीला अत्यंत शिताफीने अटक केली.

👥 

अटक आरोपी

1️⃣ शिवकुमार विनोद साह (वय 21) – भागलपुर, बिहार

2️⃣ प्रितमकुमार सुशील साह (वय 23) – भागलपुर, बिहार

3️⃣ गोविंद सुशील साह (वय 29) – भागलपुर, बिहार

4️⃣ मदन गंगा भगत (वय 23) – भागलपुर, बिहार

5️⃣ राजा रामबारानी यादव (वय 32) – भागलपुर, बिहार

(सध्या सर्वजण तळेगाव दाभाडे, पुणे येथे वास्तव्यास)

💎 

जप्त मुद्देमाल

🔹 २० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड

🔹 दागिने पॉलिश करण्याचे साहित्य

💰 एकूण किंमत – ₹२,५०,३००/-

🏅 

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे,

मा. पोलीस उप आयुक्त श्री. मिलिंद मोहिते,

मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख,

पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सुर्या जाघव, स्वप्निल घुगे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, किर्ती भोसले व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली.

⚠️ पुणे पोलिसांचा नागरिकांना इशारा

“दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा – अशा इसमांवर विश्वास ठेवू नका!”

📌 #Hashtags

#BreakingNews #ParvatiPolice #PunePolice #GoldFraud #JewelleryScam #DandekarBridge #CrimeNews #PuneCity #PoliceAction #RecoveredGold #ParStateGang #StayAlert #PublicSafety


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!