हुंडाई कंपनीची तब्बल ₹19,50,000/- किंमतीची क्रेटा कार चोरी करणाऱ्या आरोपीला काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बेड्या ठोकत केली धडाकेबाज कामगिरी!


🚨 ब्रेकिंग न्यूज | काळेपडळ, पुणे शहर 🚨

हुंडाई कंपनीची तब्बल ₹19,50,000/- किंमतीची क्रेटा कार चोरी करणाऱ्या आरोपीला काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बेड्या ठोकत केली धडाकेबाज कामगिरी!

काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या हुंडाई क्रेटा कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

तपासादरम्यान पोलीस अमंलदार शाहीद शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पालखी मार्ग, गौरी हॉटेलजवळ, महंमदवाडी, पुणे येथे संशयास्पद इसम क्रेटा कारसह आढळून आला. त्यास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव –

आदित्य अरविंद ससाणे (वय २४ वर्षे), व्यवसाय – ड्रायव्हर, रा. केतकेश्वर कॉलनी, लेन नं. १४, काळेपडळ, हडपसर, पुणे, मुळगाव – तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असे सांगितले.

त्याच्याकडे कारची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने सदर हुंडाई कंपनीची क्रेटा कार चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला –

▪️ चारचाकी हुंडाई कंपनीची ऑटो क्रेटा कार

▪️ कार क्रमांक – MH-12-YS-9260

▪️ किंमत – ₹19,50,000/-

अशा प्रकारे तब्बल ₹19.50 लाख किंमतीची चोरीस गेलेली क्रेटा कार हस्तगत करून काळेपडळ पोलीस ठाण्याने गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ०६) यांच्या मार्गदर्शनाखाली,

सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे (हडपसर विभाग) व

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार

पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांच्या नेतृत्वाखाली

पो. हवा प्रविण काळभोर, संजय बागल, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, नितीन ढोले, विशाल ठोंबरे व लक्ष्मण काळे यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 👮‍♂️🚓

🔖 हॅशटॅग्स

#BreakingNews #KalepadalPolice #HadapsarPolice #PunePolice #CretaCarTheft #HyundaiCreta #CarTheftBusted #CrimeNewsPune #PoliceAction #DCPRajkumarShinde #ACPAtulkumarNavgire #ManasinghPatil #VinayakGurav #ShahidSheikh #PuneCityNews #RecoveredVehicle #PoliceSuccess #19LakhRecovery #CrimeControl #PuneUpdates


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!