जे.एम. रोडवर मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस अवघ्या २४ तासांत अटक – पुणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!


🚨 ब्रेकिंग न्यूज | युनिट–१ गुन्हे शाखा, पुणे शहर 🚨

जे.एम. रोडवर मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस अवघ्या २४ तासांत अटक – पुणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! 📱🚔

दि. ०४/०१/२०२६ रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास जे.एम. रोडवरील जंगली महाराज मंदिरासमोर कॅबची वाट पाहत उभ्या असलेल्या नागरिकाच्या हातातील ₹70,000/- किंमतीचा सॅमसंग S-25 अल्ट्रा मोबाईल दुचाकीवरील दोन इसमांनी हिसकावून पळ काढला होता.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०६/२०२६ भा.न्या.सं.क. ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होताच युनिट–१, गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला.

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार आरोपी रात्री उशिरा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म नं.२ जवळील पार्किंगमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव –

राकेश गोवर्धन वाघीरे (वय २५), रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे असे सांगितले.

त्याच्या झडतीत –

▪️ ₹70,000/- किंमतीचा Samsung मोबाईल फोन

▪️ ₹65,000/- किंमतीची Honda Activa मोपेड (हेडलाईट व फ्रंट गार्ड नसलेली)

हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत आरोपीने साथीदारासह जे.एम. रोडवरील मोबाईल स्नॅचिंग केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी –

अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख,

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे,

सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे,

पोलीस अंमलदार सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व संदेश काकडे यांच्या पथकाने केली आहे.

🔖 हॅशटॅग्स

#BreakingNews #PuneCrime #Unit1CrimeBranch #PunePolice #JMroad #MobileSnatching #ShivajinagarPolice #CrimeBusted #PoliceAction #AjitJadhav #RahulMakhare #PankajDeshmukh #NikhilPingale #VijayKumbhar #RecoveredMobile #HondaActiva #PuneCityNews #CrimeControl #PoliceSuccess


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!