जोगेश्वरी पोलीस ठाण्याकडून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी 06 वर्षांनंतर अखेर अटक!


🔴 BREAKING NEWS 🔴

जोगेश्वरी पोलीस ठाण्याकडून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी 06 वर्षांनंतर अखेर अटक!

जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गु.र.क्र. 27/2019 मधील बलात्कार व POCSO कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी पंकज प्रकाश पांचाळ (वय 27) हा गेली सहा वर्षे फरार होता. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपी हा हजर राहत नसल्याने त्याच्यावर स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

22/11/2025 रोजी मिळालेल्या अचूक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवलकरवाडी SRA बिल्डिंग परिसरात सापळा रचून कारवाई केली. पोलिसांना पाहताच आरोपी पळण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तत्काळ पोलीस ठाण्यात आणून पुढील कार्यवाही करण्यात आली व 23/11/2025 रोजी दिंडोशी येथील सत्र न्यायालयासमोर हजर केले. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त श्री. परमजित सिंह दहिया, DCP श्री. दत्ता नलावडे, ACP संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार, सपोनि नागेश मिसाळ, पो.ह.क्र. 5968 कोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

📌 

Hashtags

#BreakingNews #JogeshwariPolice #POCSO #CrimeNews #MumbaiPolice #FugitiveArrested #6YearsOnTheRun #PoliceAction #LawAndOrder #CrimeUpdate #JusticeServed #DindoshiCourt #Jogeshwari #MaharashtraPolice #BigNews #PublicSafety #CrimeControl #SuccessOperation #PoliceForce #NewsAlert


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!