🛑 ब्रेकिंग न्यूज | पुणे – कोंढवा 🛑
कोंढवा कमेला परिसरात ‘लेडी डॉन’ शमा शेखचा दिवसाढवळ्या गांजा विक्रीचा अड्डा सुरु असल्याची जोरदार चर्चा!
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, कमेला परिसरात खुलेआम गांजा विक्री होत असून यामागे ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमा शेखचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध धंद्याला कोंढवा पोलिसांचे अभय असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधित महिला पोलिसांना नियमित हप्ते देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
नागरिकांनी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पोलीस नेमके कुणाच्या बाजूने?” असा सवाल आता कोंढव्यातील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? की पुन्हा एकदा हे प्रकरण दडपले जाणार? संपूर्ण पुणे शहराचे लक्ष आता कोंढवा कमेला परिसराकडे लागले आहे.
#BreakingNews #Kondhwa #LadyDonShamaSheikh #KondhwaKamela #DrugRacket #GanjaSale #PuneCrime #PoliceAbhay #CorruptionAllegations #CitizensDemandAction #PuneUpdates








