पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट–05, पुणे शहर पथकाने मोठी कारवाई करत खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना अटक केली आहे.


🚨 BREAKING NEWS | खंडणी प्रकरणातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखा युनिट–05 कडून बेड्या! 🚨

पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट–05, पुणे शहर पथकाने मोठी कारवाई करत खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना अटक केली आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशन गु.र.नं. 417/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5), 427, 3(5) अन्वये दाखल खंडणी प्रकरणातील पाहिजे आरोपी

➡️ सागर मुकंद अहिरराव (वय 30, रा. केदारेश्वर रेसिडेन्सी, येवलेवाडी, पुणे)

➡️ स्वप्नील सुनिल भिंगारदिवे (वय 27, रा. आदिवासी हॉस्टेल शेजारी, केशवनगर, पुणे)

हे दोघे केदारेश्वर रेसिडेन्सी, येवलेवाडी येथे उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस अंमलदार नासिर देशमुख व गणेश माने यांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धडक कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे–2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच

पोलीस अंमलदार अविनाश इंगळे, तानाजी देशमुख, नासिर देशमुख, गणेश माने, परमेश्वर कदम, राहुल ढमढेरे व परमेश्वर राऊत यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

🔥 Hashtags

#BreakingNews #PuneCrime #CrimeBranchUnit05 #ExtortionCase #Arrested #WantedAccused #KalePadalPolice #PunePolice #MaharashtraPolice #LawAndOrder #CrimeUpdate #PoliceAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!