तडीपार आरोपी हद्दीत येताच लक्ष्मीनगर पोलिसांनी रचला अचूक सापळा — आरोपीच्या मुसक्या आवळल्या!


🚨 ब्रेकिंग न्यूज | पुणे शहर 🚨

तडीपार आरोपी हद्दीत येताच लक्ष्मीनगर पोलिसांनी रचला अचूक सापळा — आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

मा. पोलिस आयुक्त पुणे शहर तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचनांनुसार लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तडीपार आदेश असतानाही कायद्याला न जुमानता पुन्हा हद्दीत प्रवेश करणाऱ्या शादब जहांगिर बांगी (वय ३१, रा. जय जवान नगर, येरवडा, पुणे) यास पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संशयिताच्या येण्याच्या ठिकाणी गुप्त सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १५० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आढळून आला.

या प्रकरणी आरोपीविरोधात येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. ३७/२०२६ अन्वये

➡️ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२

➡️ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५)

➡️ फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम कलम ३ व ७

प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसून पोलिसांकडून कोणतेही असभ्य वर्तन झालेले नाही, असे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर),

मा. रंजन कुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त),

मा. मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त – पूर्व प्रादेशिक विभाग),

मा. चिलुमुला रजनिकांत (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०४),

मा. सुनील जैतापुरकर (सह पोलीस आयुक्त, येरवडा विभाग)

यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या उल्लेखनीय कारवाईत लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम,

सपोनि रविकांत नंदनवार,

सपोनि मिथुन सावंत,

सपोनि शिवाजीराव विभुते,

पोशि ९८११ कांबळे,

पोशि १७०२ शिंदे,

पोशि ९८२२ जाधव,

पोशि ८८२७ वायाळ,

पोशि २४९२ चव्हाण,

पोशि ९१४६ गद्दे

यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

💥 कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच — पुणे पोलिसांचा स्पष्ट संदेश!

शहरातील शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

🔥 

Hashtags:

#BreakingNews

#PunePolice

#LaxminagarPolice

#YerwadaDivision

#TadiparAccused

#PoliceTrap

#CrimeControl

#LawAndOrder

#MaharashtraPolice

#PuneCity

#PoliceAction

#ZeroTolerance

#PublicSafety

#CrimeNews

#PuneUpdates


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!