लक्ष्मीनगर पोलीसांची मोठी कारवाई! येरवडा परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू उत्पादनावर लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनने निर्णायक कारवाई करत तब्बल १००० लिटर कच्चे रसायन व गावठी दारू नष्ट केली आहे.


🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨

लक्ष्मीनगर पोलीसांची मोठी कारवाई!

येरवडा परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू उत्पादनावर लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनने निर्णायक कारवाई करत तब्बल १००० लिटर कच्चे रसायन व गावठी दारू नष्ट केली आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी स.नं. १४, नाईकनगर, येरवडा येथे छापा टाकून ३ ठिकाणी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त केले. यासोबतच परिसरात सापडलेल्या १० ते १५ हातभट्टी तोडून नष्ट करण्यात आल्या आहेत.

मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर यांच्या सूचनेनुसार अवैध दारूविरोधात ही कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

👮‍♂️ पुणे पोलिसांचा इशारा: अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार!

🔖 Hashtags

#BreakingNews #PunePolice #LaxminagarPolice #Yerwada #IllegalLiquor #Hathbhatti #CrimeControl #PoliceAction #LawAndOrder #PuneCity #MaharashtraPolice


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!