🚨 ब्रेकिंग न्यूज | मांजरी पोलीस स्टेशन, पुणे शहर 🚨
🛑
अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत
मांजरी पोलिसांची मोठी कारवाई – ३३,९३० रुपयांचा १ किलो ०५१ ग्रॅम गांजा जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक नाकाबंदी, गुन्हेगार तपासणी, अवैध धंद्यांवर धडक कारवाई तसेच सातत्याने गस्त व पेट्रोलिंग सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद हालचाल करत असलेला इसम पोलिसांच्या नजरेत आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता,
आरोपी – सागर मल्हारी राखपसरे (वय ३४, रा. मांजरी)
याच्याकडून तब्बल १ किलो ०५१ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ३३,९३०/- रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक उमेश रोकडे हे करीत आहेत.
👮♂️
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली –
- मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर – श्री. मनोज पाटील
- मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६ – श्री. सागर कवडे
- मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग – श्रीमती अनुराधा उदमले मॅडम
- मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांजरी पोलीस स्टेशन – श्री. बाबासाहेब निकम
या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार –
पो.उपनि. महेश कवळे, अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे
✋
पुणे पोलिसांचा इशारा
अवैध अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी अशा प्रकारांबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
🔴 #Hashtags
#BreakingNews #ManjariPolice #PunePolice #DrugFreePune #GanjaSeizure #CrimeNews #PoliceAction #ElectionSecurity #ZeroTolerance #PuneCity 🚓💥








