धारदार शस्त्राने गंभीर मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर मांजरी पोलिसांच्या जाळ्यात!


🚨 ब्रेकिंग न्यूज | मांजरी – हडपसर परिसर हादरला! 🚨

धारदार शस्त्राने गंभीर मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर मांजरी पोलिसांच्या जाळ्यात!

पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत ३० ऑक्टोबर २०२५ रोजी शिंदेवस्ती, हडपसर येथील बॅडमिंटन मैदानाच्या मागील बाजूस झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात दहशत माजवली होती. झेपटा कंपनीत डिलिव्हरी करणाऱ्या तरुणास त्याच्या ओळखीच्या अभिषेक पाचपवार व त्याच्या साथीदारांनी आधी शिवीगाळ व मारहाण केली. मित्राबाबत माहिती दिली नाही म्हणून संतापलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर व गालावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी या गुन्ह्यात सिद्धार्थ सोनकांबळे व इतर दोन विधीसंघर्षित बालकांना अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी अभिषेक गजानन पाचपवार (वय १९, रा. म्हसोबा वस्ती, मांजरी) हा फरार होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कोंबींग ऑपरेशन राबवत खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून अभिषेक पाचपवार याला शिताफीने ताब्यात घेतले. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

🔥 #BreakingNews #ManjariPolice #HadapsarCrime #ViralAttackCase

#AbhishekPachpawarArrested #SharpWeaponAttack #PunePoliceAction

#LawAndOrder #CrimeUpdate #PuneCityNews


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!