३ लाख रुपयांची लाच मागणी करून प्रत्यक्षात १ लाखांची लाच स्वीकारताना नांदेड विमानतळ पोलीस ठाण्यातील PSI गोविंद बालाजीराव जाधव (वय 57) व पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी तांबोळी (बकल नं. 682, वय 43) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

🚨 ब्रेकिंग न्यूज | नांदेड – विमानतळ पोलीस ठाणे 🚨

३ लाख रुपयांची लाच मागणी करून प्रत्यक्षात १ लाखांची लाच स्वीकारताना नांदेड विमानतळ पोलीस ठाण्यातील PSI गोविंद बालाजीराव जाधव (वय 57) व पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी तांबोळी (बकल नं. 682, वय 43) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

महिलेवर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांत “मदत करून देतो” असे सांगत ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ACB ने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, आरोपींनी “सर्वांना मॅनेज करावे लागते” असे म्हणत लाच घेतल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी किंवा इतर सहकारी लोकसेवक सहभागी आहेत का? याचा तपास करण्यासाठी ACB ने पोलीस कोठडीची मागणी केली होती.

विशेष न्यायाधीश आर. एम. शिंदे यांनी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी नांदेड विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 512/2025 दाखल करण्यात आला असून, विशेष म्हणजे PSI गोविंद जाधव हे पोलीस पदक विजेते असल्याची माहितीही समोर आली आहे, त्यामुळे नांदेड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

🔥 #BreakingNews #Nanded #NandedCrime #ACBAction #PoliceCorruption #BribeScandal #LawAndOrder #AntiCorruption #MarathiNews

9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!