🚨 ब्रेकिंग न्यूज – पर्वती पोलीसांची मोठी कामगिरी! 🚨
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर
चारचाकी एम. महिंद्रा पिकअप चोरी करून पसार झालेल्या आरोपीस पर्वती पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करत तब्बल ₹१४,०९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १९/१२/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांचे ताब्यातील ₹९,००,०००/- किंमतीची पिकअप व त्यामध्ये ठेवलेला ₹५,२९,०००/- किमतीचा इलेक्ट्रॉनिक माल असा एकूण ₹१४,२९,०००/- चा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना, तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शिवा मिड्डठ्ठलाल यादव (वय २०, रा. काळुबाई मंदिराजवळ, वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली पुणे) यास अटक करण्यात आली.
त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली एम. महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स असा एकूण ₹१४,०९,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि–०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पो.उप-निरीक्षक किरण पवार, पो.अंमलदार सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे, प्रविण जगताप, महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसोडे, अमोल दबडे, अमित चिव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.
🔴 पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस! 🔴
#Hashtags
#BreakingNews #ParvatiPolice #PunePolice #PickupTheft #CrimeNews #AccusedArrested #StolenVehicleRecovered #PoliceAction #MaharashtraPolice #PuneUpdates #LawAndOrder #ElectronicsTheft








