🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
पुणे शहरात इतिहास रचला! पोलीस पाल्यांचा लाठी–काठी विश्वविक्रम!
पुण्यातील गुरुकुल स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने दि. ११/०१/२०२६ रोजी युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहगाव येथे World Record of Excellence – England संस्थेच्या परिक्षणाखाली अवघ्या ०३ ते १६ वयोगटातील १२९ मुला–मुलींनी सलग ०१ तास ११ मिनिटे ११ सेकंद लाठी–काठी फिरवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
या ऐतिहासिक विक्रमात सोमवार पेठ पोलीस लाईनमधील ४८ पोलीस पाल्यांनी सहभाग घेत पुणे शहराच्या नावावर सुवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे.
या विश्वविक्रमाचे अधिकृत परिक्षण श्री. विवेक पांडे यांनी केले असून, गुरुकुल स्पोर्टस् अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल सांबारे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कठोर प्रशिक्षण दिले होते.
तसेच श्री. अजित जाधव, पोलीस निरीक्षक – युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मुलांचे मनःपूर्वक कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
🏆 पुणे शहराच्या क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित झाला आहे!
#PuneBreaking #WorldRecord #LathiKathi #PoliceKidsPride #GurukulSportsAcademy #PuneCity #ProudMoment #YoungAchievers #WorldRecordOfExcellence #PuneNews #Inspiration #Discipline #Focus #HardWorkPays








