रामटेकडी खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी गाठले! अहिल्यानगर येथून ३ अट्टल गुन्हेगार अटकेत 🚔


🛑 ब्रेकिंग न्यूज — वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! 🛑

रामटेकडी खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी गाठले! अहिल्यानगर येथून ३ अट्टल गुन्हेगार अटकेत 🚔

पुणे (प्रतिनिधी) — वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने रामटेकडी येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरार ३ सराईत आरोपींना अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात यश मिळवले आहे. लक्ष्मीपुजनाच्या रात्री झालेल्या वादातून झालेल्या या हल्ल्यात जितेंद्र परमेश्वर ठोसर यांचा मृत्यू झाला होता.

📍 घटनेचा तपशील:

दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रामटेकडी येथे दिवाळी साजरी करत असताना फटाक्यांच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तीव्र भांडण झाले. या वादात खन्नासिंग कल्याणी व त्याचे नातेवाईक यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान जितेंद्र ठोसर यांचा मृत्यू झाला.

यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तांत्रिक तपास आणि बातमीदारामार्फत माहिती मिळवून अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर सापळा रचून आरोपींना अटक केली.

👮‍♂️ अटक आरोपी:

1️⃣ जलसिंग पिल्लीसिंग कल्याणी

2️⃣ गोविंदसिंग पिल्लीसिंग कल्याणी

3️⃣ जसुसिंग पिल्लीसिंग कल्याणी

💥 कारवाईत सहभाग:

सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक —

अंमलदार अभिजीत चव्हाण, विष्णु सुतार, अर्थद सय्यद, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, यतीन भोसले, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

🔹 वरिष्ठांचे मार्गदर्शन:

श्री. मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग),

डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५),

श्री. धन्यकुमार गोडसे (सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग).

👉 या अचूक आणि शिताफीने पार पडलेल्या कारवाईमुळे वानवडी पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना ठोस संदेश दिला आहे की कायद्याच्या बाहेर कोणीही नाही! 💪

#BreakingNews #PunePolice #वानवडीपोलिस #CrimeNews #MurderCase #AkhilNagarArrest #Ramtekdi #PuneCrime #PoliceAction


9
कृपया वोट करा

युवा एकजूट च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!